Type Here to Get Search Results !

लोहारा विद्यालयात शिक्षक दिन साजरा

 


*लोहारा विद्यालयात  शिक्षक दिन साजरा*

5/9/2023*धी शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को-ऑपरेटिव्ह सोसायटी द्वारा संचलित डॉक्टर जे जी पंडित माध्यमिक विद्यालय लोहारा येथे 5 सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात आला या दिवशी विद्यार्थी शिक्षक  बनून तासिका घेतल्या व दिवसभराचे कामकाज पाहिले यानंतर5 सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन  डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो  तसेच डॉ जे जी पंडित यांची पुण्यतिथी असते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को-ऑपरेटिव्ह सोसायटी चे ज्येष्ठ संचालक आबासाहेब भीमराव शामराव शेळके हे होते तर उपस्थित मान्यवरांमध्ये विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक अ. अ. पटेल सर सामाजिक कार्यकर्ते अण्णाभाऊ बेलदार माजी उपसरपंच आबा चौधरी  गोपाळ पांढरे, गणेश कोळी व माणुसकी समूहाचे जळगाव जिल्हा अध्यक्ष  गजानन*

*भाऊ क्षिरसागर उपस्थित होते सुरुवातीला कार्यक्रमाचे अध्यक्ष व विद्यालयाचे मुख्याध्यापक एसटी चिंचोले सर व उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण व डॉक्टर जे जे पंडित यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थी शिक्षिका प्रांजल पालीवाल हिने केले  उपस्थित मान्यवरांचा विद्यालयाच्या वतीने रुमाल टोपी व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला सामाजिक कार्यकर्ते अण्णाभाऊ बेलदार यांनी शिक्षक दिनाचे औचित्य साधून सर्व शिक्षकांचा व शिक्षकेतर कर्मचारी यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वतः सत्कार केला यानंतर शेंदुर्णी एज्युकेशन को-ऑपरेटिव शेंदुर्णी संस्थेच्या वतीने सुद्धा शिक्षकांचा रुमाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार झाला यानंतर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन* *व डॉ. जे जी पंडित यांच्या कार्याविषयी माहिती आपल्या मनोगतातून व्यक्त केली विद्यार्थी शिक्षकांनी सुद्धा दिवसभरात कशा पद्धतीने शिक्षकांना कामकाज करावा लागते त्यांना आलेले अनुभव सुद्धा सांगितले मान्यवरांमधून गजानन भाऊ क्षिरसागर अ अ पटेल सर यांनी आपले मनोगत व्यक्त करून डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या शैक्षणिक कार्याविषयीची माहिती दिली शिक्षकांमधून विद्यालयाचे मुख्याध्यापक एस टी चिंचोले सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले* *डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी शिक्षणामध्ये स्वतःची साधलेली प्रगती व शिक्षणाचे महत्त्व विशद केले तसेच डॉ. जे जी पंडित यांचे गरीब रुग्णांविषयीचे असलेले प्रेम व दयाभाव सांगितले यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी शिक्षिका नम्रता चौधरी चंचल चौधरी हिने केले व आभार  प्रांजल पालीवाल हिने मानले आज विद्यार्थी शिक्षकांनी* *शिक्षकाच्या भूमिका केलेल्या होत्या त्यामुळे विद्यार्थ्यांमधून विद्यार्थी  शिक्षकांचे कौतुक होत होते या कार्यक्रमासाठी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते*

         जनसेवा न्यूज 24 मुख्य संपादक: सागर गिरी

Post a Comment

0 Comments