Type Here to Get Search Results !

पाचोर्‍यातील मनसे सचिव पाणीपुरी व्यवसायिक पोलीस निरीक्षक अशोक कचरू पवार यांच्याकडून शिवीगाळ व अमानुषमारहाण जिल्हाभरातून मनसे आक्रमक कारवाई करण्याचे आदेश


सविस्तर बातमी पुढील प्रमाणे

*विषयः पाचोरा पोलीस स्टेशन चे निरीक्षक यांच्यावर कायदेशीर कारवाई होऊन पाचोरा तालुक्यातील अवैध धंदे तत्काळ बंद करण्याबाबत.* 


 *मा. महोदय,* 


पाचोरा येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे, शहर सचिव श्रीकृष्ण विठ्ठल दुन्दुले. हे आपल्या परिवारासह आदर्श नगर येथे आपल्या वयस्कर आई-वडिलांसोबत राहतात. शहरामध्ये रोजगार उपलब्ध नसल्याने इतर कुठलाही अवैध धंदा न करता, स्वताचा व परिवाराचा उदरनिर्वाह करण्यासाठी पाणीपुरीचा व्यवसाय करतात. (ठिकाणः भडगाव रोड पाचोरा.)


दिः१६/०६/२०२४ रोजी रात्री १०:३० ते १०:४५ च्या सुमारास पाचोरा पोलीस स्टेशन चे निरीक्षक श्री. अशोक कचरू पवार यांनी त्यांना गाडीमध्ये अर्वाच्य भाषेत शिवीगाळ व दमदाटी करून पोलीस स्टेशन ला आणून, एका अट्टल गुन्हेगारासारखे वागणूक दिली. त्यांना आई-बहिणीवरून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून पक्षाचा व पक्षातील पदाधिकाऱ्यांचा अर्वाच्य भाषेत उल्लेख करून त्यांना मारहाण केली. त्यांचा काही दिवसांपूर्वी अपघात झाला असून त्यांनी वारंवार सदर अधिकाऱ्याला या संदर्भात माहिती दिली असतांना देखील त्यांची दाढी ओढून त्यांना नशेत असलेल्या होमगार्ड कडून देखील मारहाण केली.


स्वताच्या परिवाराच्या उदरनिर्वाहासाठी पानुपुरीचा व्यवसाय करणे हा गुन्हा झाला आहे का? सदर युवकास पाणीपुरीचा व्यवसाय हा तीनपाट आहे, १०-१० रुपये जमा करत फिरतो, भिकारचोट अशा शब्दांमध्ये स्वाभिमानाने पोट भरणाऱ्या युवकाला उपदेश केला म्हणजे सदर अधिकाऱ्याला वैध पणाने काम करणारे लोक चालत नाहीका? त्यांच्या दृष्टीने सट्टे खेळणारे, पत्त्यांचे क्लब चालवणारे आदर्श व्यावसायिक वाटतात. शेवटी प्रामाणिकपणाने काम करणाऱ्या व्यक्तींना कुठलाही व्यवसाय लहान नसतो. इतकी समज दोन नंबरच्या धंद्यांचे हफ्ते खाणाऱ्या अधिकाऱ्याला कसे कळेल. तालुक्यामध्ये दिवसरात्र अवैध धंधे (पत्ते, सट्टे, दारू, वाळू, गांजा इ.) यांच्या आशीर्वादाने जोरात सुरु आहेत. परंतु आपला कायद्याचा धाक अशा अवैध धंदा करणाऱ्यांना न दाखवता. आपल्या पोटाची खळगी भरणाऱ्या, गरीब होतकरू गरजवंतावर दाखविण्याची बहादुरी सदर अधिकाऱ्याने दाखविली आहे. म्हणजेच ज्यांना कायद्याचा धाक पाहिजे त्यांना स्वताच्या आर्थिक लाभासाठी अभय दिले जाते. आणि एखादा गरजवंत वैध पद्धतीने पोटापाण्यासाठी व्यवसाय करीत असलेल्या तरुणांना काय‌द्याचा धाक दाखवून कायद्याप्रती भीती निर्माण केली जाते. अशा मुजोर अधिकाऱ्याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे जाहीर निषेध करीत असून, सदर अधिकाऱ्यावर पोलीस प्रशासनातर्फे कारवाई करण्यात यावी. तसेच पाचोरा शहरातील व तालुक्यातील पत्त्यांचे क्लब, सट्टा-मट्टा, अवैध वाळू वाहतूक तात्काळ बंद करण्यात यावी. येणाऱ्या ८ दिवसात सदर मागण्यांकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष झाल्यास दिः२६ जून रोजी प्रशासनाचे डोळे उघडविन्यासाठी पिडीत तरुणासह पक्षाचे कार्यकर्ते आमरण उपोषणास बसणार आहोत. याची कृपया नोंद घ्यावी..

जिल्हाभरातून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक भूमिका घेणार असे मनसे नेत प्रकाश बाविस्कर यांनी सांगितले 

जनसेवा न्यूस 24 मुख्य संपादक सागरगिरी

Post a Comment

0 Comments